भाजपच्या माजी आमदाराने गोळीबार केलेला वाद पुन्हा उफळला, निलेश शिंदेंनी न्यायालयाला दिले सत्यप्रतिज्ञा पत्र
२०१४ साली पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या एका राडा प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या कल्याण न्यायालयात जबाब नोंदविला गेला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हा गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर निलेश शिंदे यांनी नकारला आहे. केबलच्या वादातून गणपत गायकवाड आणि निलेश शिंदे यांच्या वाद झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्याबाबत आम्ही पोलिसांना भेटण्याकरीता गेले होतो. असा काही प्रकार घडला नाही, असे दोन्ही पक्षाने न्यायालयासमोर सांगितले आहे. या प्रकरणात गायकवाड यांनी जबाब नोंदविला आहे. तर निलेश शिंदे यांनी सत्यप्रतिज्ञा पत्र दिले आहे. याआधी पाच साक्षीदारांनी केबलच्या वादातून भांडण झाल्याची साक्ष दिली होती.
कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात तळोजा कारागृहात आहे. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात ते जेलमध्ये आहे. गणपत गायकवाड यांना ११ नोंव्हेबर २०१४ रोजी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या दालनाच झालेल्या राड्या प्रकरणात कल्याण न्यायालयात जबाब नोंदविण्याकरीता आज (2 एप्रिल) हजर केले गेले. यावेळी पोलिसांच्या मोठा बंदोबस्त होता गायकवाड यांनी न्यायालयात आले. त्यांच्यासोबत त्यांचे भाचे कुणाल पाटील आणि विकी गणात्रा यांची देखील न्यायालयात हजेरी होती. गणपत गायकवाड यांच्यासोबत निलेश शिंदे यांचा वाद झाला होता. ते देखील न्यायालयात हजर राहिले असून या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधिशाने पाच साक्षीदारांनी का साक्ष दिली आहे ? ते गणपत गायकवाड यांना ऐकविले.
केबलच्या वादातून निलेश शिंदे आणि गणपत गायकवाड हे पोलिस ठाण्यात आले असता शिवीगाळ आणि वाद झाल्याची साक्षीदारांनी सांगितले होते. गणपत गायकवाड यांनी असे काही झाले नाही असा जबाब नोंदविला होता. मी त्यावेळी आमदार असल्याने आमच्या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी वाढत असलेल्या गुन्ह्या बाबत सह्याची मोहिम सुुरु केली होती तसे सत्य प्रतिज्ञा पत्रही त्यांनी दिले आहे. या प्रकरणात निलेश शिंदे यांनी देखील एक सत्यप्रतिज्ञा पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुपेश गायकवाड यानी मोहिम सुरु केली होती. केबलच्या वादातून वाद झाला नसल्याचे दोघांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या विरोधात त्यावेळी मोहिम सुरु केली होती म्हणून अशा प्रकारचा गुन्हा दाखल केल्याची शक्यता दोन्ही पक्षाकडून वर्तविण्यात आली. न्यायालयात आमदार गायकवाड यांना जेवण करण्याची अनुमती दिली होती. यावेळी त्यांना पुन्हा कारागृहात घेऊन जात असताना त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली. त्याचा व्हीडीआो काढण्याचा प्रयत्न केला. समर्थक आणि पोलिस यांच्यात प्रचंड रेटा रेटी झाल्याने न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला होता.