तपासणीदरम्यान ए-१ कोचमधील बर्थ क्रमांक १ व ६ खाली ठेवलेले ४ पिड्डू बंग व २ ट्रॉली बंग संशयास्पद अवस्थेत आढळले. बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला. चौकशी केली असता बंग वरील आरोपींची असल्याचे समोर आले. दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता बॅग त्यांचीच असल्याची कबुली दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त अमली पदार्थांसह दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी जीआरपी इतवारी पोलिसांकडे सुपूर्द केले. ही कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा दल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडल यांनी केली.
सिंदी उमरीतून तंबाखू तस्करी; चारचाकीसह दोघे पोलिसांच्या ताब्यात
सावरगाव, वार्ताहर, राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नरखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली, कारवाईत ७ लाख ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन आरोपींना अटक केली.
माहितीच्या आधारे सावरगांवजवळील सिंदी लाखाहून अधिकचा सुगंधित मोठ्या प्रमाणात बंदी असलेला सुगंधित तंबाखू जप्त शुक्रवारी नरखेड पोलिस स्टेशन हद्दीत गुप्त (उमरी) परिसरात पोलिसांनी सापळा रचला. संशयित चारचाकीची तपासणी केली असता आढळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत प्रतीक कंचन गजभिये (२८, रा. नागपूर) व देवेंद्र धनराज कडवे (३५, रा. नागपूर) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून सुमारे ४०७ किलो सुगंधित तंबाखू तसेच एमएच-४०/एआर-३२४८ ही चारचाकी जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख ७ हजार ९०० आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा तंबाखू साठा कुठून आणला व कुठे नेला जात होता याचा पुढील तपास नरखेड पोलिस करीत आहे.
Ans: नागपूर रेल्वे स्थानक परिसरात हावडा–मुंबई एक्स्प्रेसमध्ये तपासणीदरम्यान कारवाई करण्यात आली.
Ans: ६०.७५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याचे बाजारमूल्य ३० लाख ३७ हजार ५०० रुपये आहे.
Ans: चंदेश्वर पासवान (४१) आणि विक्की कुमार (१९), दोघेही बिहारचे रहिवासी असून त्यांना पुढील कारवाईसाठी जीआरपी इतवारी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.






