विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ (फोटो : संग्रहित फोटो)
पुसद : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात शेंबाळपिंपरी येथे सख्ख्या भावानेच धाकट्या भावाची हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री नऊच्या सुमारास घडली. दिनेश जयवंत शिरफुले (21, रा. शेंबाळपिंपरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मनीष जयवंत शिरफुले याने त्याचा लहान भाऊ दिनेश शिरफुले याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद केला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर मनीषने लहान भाऊ दिनेशच्या डोक्यात फावडा मारून गंभीर जखमी केले. या मारहाणीत दिनेशच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर जखमीला शेंबाळपिंपरी येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, रक्तस्राव झाल्याने त्याला पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून दिनेशला मृत घोषित केले. तोवर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे 3 पथके तयार आहेत.
दरम्यान, आरोपी मनीषच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या आदेशान्वये खंडाळाचे पोलिस निरीक्षक देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
अमरावतीतही हत्येचा प्रकार
धाकट्या भावाने थोरल्या भावावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. ही घटना बेनोडा शहीद येथे उघडकीस आली. प्रशांत लक्ष्मण घोरसे (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अजय लक्ष्मण घोरसे (वय 42) याच्याविरुद्ध हत्येच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावानेच भावाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.