बिहारमधील (Bihar) सिवान जिल्ह्यात (Siwan District) बीएसएफ (BSF) जवानाने अवघ्या ८० रुपयांसाठी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
पीडिताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली. आरोपी उज्ज्वल पांडे याच्याकडून पिस्तूल, दोन मॅगझिन, चार जिवंत काडतुसे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
ही घटना महाराजगंज येथील पोखरा गावातील आहे. येथे राहणारा मुन्नीलाल ताडी विकत होता. BSF जवान उज्ज्वल पांडे त्यांच्याकडे ताडी पिण्यासाठी आला.
[read_also content=”जल्लाद डॉक्टर, असहाय्य महिला आणि दोन्ही किडन्या गायब…असा गुन्हा यापूर्वी कधीच पाहिला नसेल! कारण ऐकून तुमचाही डॉक्टरवरचा उरलासुरला विश्वासच उडेल https://www.navarashtra.com/crime/too-much-horrible-bihar-muzaffarpur-woman-victim-kidney-theft-quack-doctor-investigation-inside-story-police-crime-nrvb-367807.html”]
ताडी पिऊन मुन्नीलालने पैसे मागितले असता उज्ज्वल पांडे संतापले. त्यांनी जागीच तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे मुन्नीलाल गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला सिवानच्या सदर रुग्णालयात दाखल केले आणि सदर घटनेची पोलिसांना माहिती दिली.
[read_also content=”परळीतील मुंडे प्रकरणाची औरंगाबादमध्ये पुनरावृत्ती; गर्भपात केल्याने महिलेची प्रकृती बिघडली, डॉ. पती-पत्नी दोघेही फरार, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/aurangabad-crime-shocking-news-information-in-aurangabad-abortion-case-chances-of-a-big-racket-nrvb-367786.html”]
याप्रकरणी महाराजगंजचे एसडीपीओ पोलास्ट कुमार यांनी सांगितले की, आरोपी उज्ज्वल पांडेला अटक करण्यात आली आहे. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. तो रतनपूरचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल, दोन मॅगझिन आणि चार जिवंत काडतुसे याशिवाय एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमी मुन्नीलाल यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.