नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले ३९ कंटेनर पकडले, नऊ कोटींचा माल हस्तगत (फोटो सौजन्य-X)
Navi Mumbai News in Marathi : केंद्रीय एजन्सी डीआरआयने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून पाकिस्तानी वस्तूंनी भरलेले ३९ कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनरमध्ये सुमारे १,११५ मेट्रिक टन माल होता. ज्याची बाजार किंमत सुमारे ९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. डीआरआयने या प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील केली आहे. तर उर्वरितांची चौकशी सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील थेट आयात आणि निर्यातीवर बंदी आहे. असे असूनही, काही लोक दुबईमार्गे पाकिस्तानी वस्तू भारतात आणत असत. भारत सरकार त्यावर सुमारे २००% कस्टम ड्युटी लावत असे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी उत्पादनांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातली होती. २ मे २०२५ पासून पाकिस्तानातून आयात केलेल्या वस्तू कोणत्याही तिसऱ्या देशातूनही भारतात आणण्यास परवानगी नव्हती.
या मोहितेंतर्गत कारवाई करीत ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी जेएनपीए बंदरातून पाकिस्तानी ३९ कंटेनर जप्त केले आहेत. वाहतुकीवरील निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन करून पाकिस्तानने ओळख लपवून हे ३९ कंटेनर थेट दुबई, यूएईमार्गे जेएनपीए बंदरातून भारतात पाठविले. पाकिस्तानच्या या कारनाम्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना मिळाली.
जप्त केलेल्या कंटेनरमध्ये वाळलेल्या खजूर आढळून आल्या. पाकिस्तानी खजूरांवर यूएईचे लेबल लावण्यात आले होते. तपासात असे दिसून आले की या खजूर पाकिस्तानी आहेत. हा माल प्रथम पाकिस्तानच्या कराची बंदरातून दुबईच्या जबेली अली बंदरात आणण्यात आला आणि तेथून तो भारतात पाठवण्यात आला. तपासात पाकिस्तानी कंपन्या आणि भारतीय नागरिकांमध्ये पैशाचे व्यवहारही उघड झाले आहेत.
सुरुवातीला हा माल एका कंटेनर आणि जहाजावरून पाकिस्तानातून दुबईला नेण्यात आला आणि नंतर तो भारताकडे जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनर आणि जहाजांवर हलवण्यात आला. मालाच्या तपासणीदरम्यान पाकिस्तानची हेराफेरी उघडकीस आली. हा माल पाकिस्तानच्या कराची बंदरातून निघाला आणि दुबईतील जबेल अली बंदरावर तो भारताकडे जाणाऱ्या जहाजांवर चढवण्यात आला. याशिवाय, पाकिस्तानी संस्थांबरोबर झालेले पैशांचे हस्तांतरण/ आर्थिक संबंध उघडकीस आले आहेत.