कोल्हापुरातून एक धक्कादायक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका मद्यधुंद कारचालकाचा कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर थरार अनुभवायला मिळला आहे. महाद्वार रोडच्या वन वेतुन आत येत या मध्यधुंद कारचालकाने अनेक महिलांसह , भाविकांना धडक दिली आहे. तरी काही दुचाकींना सुद्धा जोरदार धडक दिली आहे. कायम वर्दळीच्या ठिकाण असलेल्या महाद्वार रोडवर हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून या कार चालकाला रोखल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. यावेळी संतप्त जमावाने त्या कारचालकाला कपडे फाटेपर्यंत धुलाई केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा मध्यधुंद कारचालक सांगलीचा असून प्रसाद दत्तात्रय सुतार असे त्याचे नाव असलयाचे तपासात समोर आले आहे. यावेळी प्रसाद सुतार यांच्यासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई केली जात आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जमिनीच्या व्यवहारात फसवणूक, १२ जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल