पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्राफिक डिसिपीच्या गाडीलाच ठोकल्याचे समोर आले आहे. हा अपघात डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीची झाली आहे. या अपघात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. मुंढवा पोलिसात मद्यधुंद चालकांविरोधात ड्रँक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Kolhapur Crime News: बसमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने उचचले टोकाचा पाऊल
दोन आरोपी ताब्यात
पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच धडक दिल्याची घटना समोर आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केशवनगरमध्ये रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटनेत डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं. ते दारू प्यायले होते अशी माहिती समोर आली आहे.
संतापजनक! जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर मारली लाथ
जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जालनाच्या डीवायएसपींनी आंदोलन कर्त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जालन्यात एक कुटुंब जिल्ह्यादखिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. यावेळी सुरु असलेल्या आंदोलन स्थळावरून एका कुटुंबाने पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला पण यावेळी पोलिसांनी अडवलं. पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकांच्या कमरेत मागून लाथ मारली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे या जालनामध्ये आल्या होत्या. यावेळी जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी अडवलं. यानंतर पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी यावेळी एका चिमुकल्या लेकरालाही हाताला धरून सोबत नेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
आंदोलनकर्त्यांनी कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी