जतमध्ये वडिलांनी संपवले जीवन (फोटो- istockphoto)
सबंधित शेअर कंपन्यांच्या प्रतिनिधीनी यातील बहुतांशी मोठ्या गुंतवणूकदारांना देश विदेशात विमान प्रवासही घडवून आणला आहे. कालांतराने या शेअर मार्केटचे जे मुख्य होते त्यांनी गुंतवणूकदारांचे जादा परतावा देतो म्हणून घेतलेले पैसे घेऊन विदेशात पळ काढल्याने जादा परतावा वेळेवर मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार हडबडून गेले व ते आपणाशी संपर्कात असलेल्या वरिष्ठांना मोबाईल व्दारे संपर्क करू लागले.परंतु वरिष्ठ पातळीवरचे सर्वच लोक नाॅटरिचेबल लागू लागल्याने स्थानिक गुंतवणूकदार धास्तावून गेले आहेत.
जे स्थानिक लोक हे या जादा परताव्याच्या आशेने गुंतवणूकदारांच्या नेहमी संपर्कात आले आहेत त्यांची अवस्था घर का ना घाट का अशी झाली आहे. कारण गुंवणूकदारांकडून जादा परतावा देतो म्हणून शेअर मार्केट कंपनीचा हवाला देऊन ज्या स्थानिक एजंटानी मोठ्या रक्कमा गोळा करून त्या वर कंपनीकडे पाठविल्या आहेत. त्यांच्याशी शेअर मार्केट कंपन्याचे संचालक हे कोणत्याही प्रकारे संपर्कात येत नसल्याने जादा परताव्याच्या अपेक्षेने मोठ्या मोठ्या रक्कमा घेतलेल्या स्थानिक एजंटाकडे गुंतवणूकदार पैसै परत मागीत असल्याने या एजंटावर आपली स्थावर मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागत आहेत.
जत तालुक्यात जादा परताव्याच्या अपेक्षेने शेअर मार्केटमध्ये पाचशेकोटीहून जास्त रक्कम गुंतवली गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या शेअर मार्केटमुळे जत येथिल शासकिय तंत्रनिकेतन काॅलेजमधील तानाजी गायकवाड या शिपायाला आपल्या मुलांने नितीन यांने जादा परतावा देतो म्हणून गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे वरिष्ठांनी घेऊन विदेशात पळ काढल्याने आपणाला देणे अशक्य असल्याने गुंतवणूकदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून पळ काढला आहे.
परंतु आपले पैसे घेतलेल्या एजंटाने पळ काढल्याने हे गुंतवणूकदार नितीन याचे वडिल तानाजी गायकवाड यांच्यामागे मुलाने जादा परतावा देतो म्हणून शेअरमार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत करा म्हणून नितिन याच्या अत्यंत जवळचा असणारी आणखी एक एजंट याला जबाबदार न धरता नितीन याचे वडिल तानाजी गायकवाड यांना रस्त्यावर आडविणे,घरात येऊन दाब देणे,माणसिक त्रास देणे असे करू लागल्याने नितीन याचे वडिल तानाजी गायकवाड यांनी सबंधित गुंतवणूकदारांच्या विरोधात जत पोलीसात लेखी तक्रारही दिली आहे.
शेअर मार्केटमुळे आत्महत्या करण्याची वेळ तानाजी गायकवाड यांच्यावर ज्या गुंतवणूकदारांनी आणली व ज्यांच्या विरोधात गायकवाड यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.अशा सर्वांच्यावर तानाजी गायकवाड यांच्या आत्महत्येस जबाबदार म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठा ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्थेचे व्हा.चेअरमन श्रीकृष्ण पाटील यांनी केली आहे.