Photo Credit- Social Media
पुणे: पुण्यातील ससून रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, पोर्शे कार प्रकरणामुळे ससून रुग्णालययातील गैरकारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता पुन्हा धक्कादायक बातमी समोर आली आहे.ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधीचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. ससून रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरफायदा घेत तब्बल 4 कोटी 18 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.
ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांना या घोटाळा लक्षात येतील त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि 7 खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,31 जुलै 2023 ते 24 जानेवारी 2024 या काळात हा आर्थिक घोटाळा झाला. अनिल माने हा ससून रुग्णालयात अकाऊटंट आणि चाबुकस्वार हा रोखपाल म्हणून काम करतात.
हेही वाचा: आपल्या लिव्हरमध्ये फॅट जमा होत आहे, हे ‘या’ लक्षणांमुळे समजते
ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांना रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय संचलानायाच्या स्तरावर एक चौकशी समिती नेमली. या समितीने केलेल्या तपासात रुग्णालयात 4 कोटी 18 लाखांचां गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर या प्रकरणात गोरोबा आवटे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आवटे यांच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या आर्थिक गैरव्यवहारात लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा: जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि