कोकणात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी वाढली; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी
इचलकरंजी : शारीरिक, मानसिक व जाचहाट करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मल्लवा दिलीप चलवादी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मल्लवा हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटकही केली आहे.
पोलिसांनी महिलेचा पती दिलीप हणमंत चलवादी (वय २५), दीर आनंद चलवादी (वय २९), राजू चलवादी (वय २७), सासरे हणमंत चल्लाप्पा चलवादी (वय ५५), सासू यल्लावा हणमंत चलवादी (वय ४५), प्रियांका आनंद चलवादी (वय २५, सध्या रा. कलानगर मूळ रा. खोडबागी जि. विजापुर) या ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्यादी शिवाप्पा यल्लाप्पा चलवादी (वय ४९, रा. आसरानगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.
हणमंत व त्यांचे चलवादी कुटुंबिय बांधकाम साईटवर काम करतात. लग्नानंतर दिलीप चलवादी यांची पत्नी मल्लवा हिचा सासरच्या मंडळीकडून किरकोळ कारणावरून शिवीगाळ करण्यासह तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून मल्लावा हिने राधाकृष्ण चौक परिसरातीलच एका बांधकाम साईटवर 26 एप्रिल 2025 रोजी स्लॅबच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
दरम्यान, मल्लवा हिचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरकडील मंडळीच्या विरोधात शिवप्पा चलवादी यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सासरे हणमंत, पती दिलीप, सासु यल्लावा आणि दिर आनंद चलवादी या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.