वाहतूकीचे नियम पाळणं प्रत्येकाला अनिवार्य आहे त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. दुचाकीस्वारांनी कोणत्याही परिस्थितीत विना हेल्मेट वाहन चालवू नये, विना सिटबेल्ट चारचाकी वाहन चालवू नये, पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये अन्यथा अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी अभियानात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






