सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई (फोटो- सोशल मीडिया)
अकलूज: शहरातील 13 सराईत गुन्हेगारांवर अकलूज पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. या कारवाईमुळे अकलूजसह माळशिरस तालुक्यातील गुन्हेगारी विश्वाचे धाबे दणाणले आहे. मौजे अकलुज, तालुका माळशिरस येथील लक्ष्मण बंदपट्टे व ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरूध्द वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी त्यांचे साथीदारासह गंभीर गुन्हे केलेबाबत पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत.
या गुन्हेगारांची टोळी सक्रीय असुन त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटीतरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवलेली होती. या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांनी मागील 10 वर्षामध्ये सातत्याने घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराचा वापर करून जबर दुखापत पोहोचवणे, मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने दुखापत पोहोचवणे, घातक हत्याराने सज्ज होवून गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवलेली होती.
गुन्हेगार टोळीतील सदस्या विरूध्द यापुर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. दि. 14/06/2025 रोजी या टोळीने संयुक्तरित्या एकत्र येवून खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यावरून अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर 440/2025 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपी हे संघटीतरित्या एकत्र येवून टोळीचे वर्चस्व राहावे व त्यातुन टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारवांर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम 1999 या कलमाचे अंतर्भाव होणेबाबचा प्रस्ताव अकलुज पोलीस ठाणे कडून सादर करण्यात आला होता.
सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी सदर गुन्हेगार टोळीतील आरोपीता विरूध्द संघटीत रित्या एकत्र येवून केलेले गुन्हे, गुन्हेगारी पार्श्वभुमी, टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवणे, बेहिशोबी मालमत्ता बाळगणे, त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपीना मोक्का कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे तसेच या गुन्हयाचा पुढील तपास संतोष वाळके, उप विभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज यांचेकडे देण्यात आला आहे.
Raigad Crime : प्रेम, लग्न आणि फसवणूक…! “शारीरिक संबंध ठेवं अन्यथा…”, 19 वर्षीय पतीला अटक