लखनऊच्या कृष्णानगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आई गाढ झोपली की, स्वतः प्रियकराशी बोलण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी मुलगी रात्री घरातून बाहेर पडायची. प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे, मुलीकडे एक विषाची बाटली सापडली असून, ती आईला ठार मारण्याच्या हेतूने दिल्याचा खुलासा चौकशीत झाला आहे.
पालघर हादरलं! केळवेतील रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार
आईची तब्येत बिघडत गेली
सलग तीन महिन्यांपर्यंत झोपेच्या गोळ्यांमुळे आईची तब्येत सतत बिघडत गेली. तिला थकवा, भ्रम, चक्कर यांसारखी लक्षणं दिसू लागली. वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचं निदान झालं.
पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने स्वतः कबूल केलं की, प्रियकराच्या सांगण्यावरून तिने आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिच्या खिशात एक विषाची बाटली सापडली. तिचा दावा होता की, आईला ठार मारण्याचा विचार तिने केला होता, पण अखेर ती योजना फक्त झोपेच्या गोळ्यांपुरतीच मर्यादित राहिली.
मुलीच्या या धक्कादायक वर्तनामागे तिचा प्रियकराशी असलेला भावनिक गुंता आणि आईशी नसलेला संवाद हे मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्या मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले असून एका निवारागृहात ठेवण्यात आले आहे.
दलित वृद्धाच्या रहस्यमयी हत्येमागचं थरारक सत्य समोर
गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील जाखोत्रा गावात घडलेली एक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. एका अर्धवट जळालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडल्याने प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनले होते. मृत व्यक्ती दलित समाजातील असल्याने जातीय तणाव निर्माण होण्याची भीती होती. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासानंतर जी वस्तुस्थिती समोर आली, ती चकित करणारी होती. सविस्तर बातमी दलित वृद्धाच्या रहस्यमयी हत्येमागचं थरारक सत्य समोर, ‘गीता मृत’ दाखवून प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट उघड