पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी तेजल शिवराम भिडे ही जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर जखमी मुलीवर बोईसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंदूक दाखवतांना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. नेमका कसा हा प्रकार घडला? याची माहिती पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बंदूक दाखवताना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती देण्यात आली आहे. पण हेच नेमकं कारण आहे की आणखी काही वेगळा प्रकार आहे, यासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.
Crime News: पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल
दौंड: गुन्ह्यातील जप्त असलेली गाडी न्यायालयातून सोडविण्यासाठी आवश्यक असलेला तपासी अधिकाऱ्यांचा लेखी जबाब न्यायालयात देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, तीन फ्लॅट फोडले
हडपसर परिसरातील रामटेकडी, मांजरी बुद्रुक आणि फुरसुंगी येथील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोलापूर रोड भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे सव्वा तीन लाख रुपयांच्या किमती मुद्देमालाची चोरी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. सोलापूर रस्ता परिसरात सतत या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अखेर निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक, कसा पोहोचला नेपाळ?