चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकीत दरम्यान अचानक जनरेटरचा मोठा स्पोट झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिलांसह सात जण जखमी झाले आहेत.
स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान जनरेटरमधील डिझेल संपल्यामुळे कोणीतरी त्यात डिझेल टाकले. मात्र जनरेटर गरम असल्यामुळे डिझेल टाकतांना त्याचा स्फोट झाला आहे. यावेळी जनरेटरमुळे त्यावेळी उभ्या असलेल्या चार महिलांसह सात जण जखमी झाले आहे. सध्या जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
घरात कोणी नसल्याची संधी साधत तरुणाची हत्या; चाकूने गळा चिरला अन्…
घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञाताने तरुणाचा गळा चिरून हत्या केली. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे शुक्रवारी (दि.19) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. राजू आनंदराव सिडाम (वय 35, रा. मोहाळी, ता. सिंदेवाही) असे मृताचे नाव आहे. मृत तरुण दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्या वादातूनच खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. राजू व त्याची पत्नी पूनम, मुलगा मेहरदीप व मुलगी वैष्णवी मजुरीचे काम करण्यासाठी वरोरा येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. परंतु, त्याला दारूचे व्यसन असल्याने घरमालक फार काळ ठेवायचे नाही. त्यामुळे पत्नीला तेथेच ठेवून तो अलीकडेच त्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.
दरम्यान, घरात कोणीही नसताना त्याची हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याच्या घरी त्याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याचा खून कोणत्या कारणामुळे व कुणी केला, याचा तपास पोलिस घेत आहेत.
यासाठी पोलिसांनी श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले होते. आरोपी ज्या दिशेने पळाले त्या दिशेला श्वान फिरून आला. रात्री त्याच्या घरी आलेल्या लोकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांत विविध चर्चाण उधाण आले आहे.
नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…