शिक्रापुरात कंटेनरचालकाकडून 42 लाखांच्या मालाचा अपहार; चौघांवर गुन्हा दाखल (फोटो- istockphoto)
पिंपरी: घरासमोर राहणारा व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत थांबल्याने त्याला कपडे घालण्यास सांगणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (१६ एप्रिल) सकाळी साडेनऊ वाजता उरो क्वार्टर्स, औंध येथे घडली. सागर नवनाथ शिंगाडे (३१, रा. उरो क्वार्टर्स, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश कृष्णा लोखंडे (५७, उरो क्वार्टर्स, औंध) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि ओरपी सतीश हे एकमेकांच्या समोर राहतात. सतीश लोखंडे हा बुधवारी सकाळी घराबाहेर अर्धनग्न अवस्थेत थांबला होता. त्यामुळे सागर यांनी सतीश याला पूर्ण कपडे घालण्यास सांगत अशा पद्धतीने न थांबण्यास सांगितले. त्या कारणावरून सतीश याने बर्फ फोडण्याच्या टोच्याने सागर यांना मारहाण केली.
पिंपरीत दोन गट भिडले
चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.
PCMC Crime: ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले; मग कोयता काढला आणि थेट…
बॅटने हल्ला करून महिलेस गंभीर दुखापत
मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान महिलेस बॅटने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात झाले. या प्रकरणी थेरगाव येथील तिघांविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संदिपनगर, थेरगाव येथे घडली.
या प्रकरणी एक महिला फिर्यादी म्हणून पुढे आल्या असून, अनिल कांबळे व दोन महिला आरोपी (सर्व रा. संदिपनगर, थेरगाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा लहान मुलगा आणि आरोपींची मुले यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यातूनच आरोपी महिला क्रमांक २ व ३ यांनी फिर्यादीच्या मुलीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.