छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदाराच्या पुतण्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पुतण्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या २६ वर्षाच्या पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव दीपेश राजू तनवाणी असे आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आला आहे. ही घटना उस्मानपुरा भागातील अमृत साई एकदंत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये घडली आहे. दीपेश राजू तनवाणी असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजीमध्ये सुसाईड नोट लिहून ठेवली. तसेच काही व्यवहारांची आकडेमोड सुद्धा सुसाईड नोटमध्ये आहे. ही आकडेमोड नेमकी कसली आहे. यात किती गुंतवणूक आहे याबाबत तपास केला जात आहे.
सुसाईड नोटमध्ये काय?
‘माफ करा, सगळ्यांना त्रास दिल्याबद्दल. तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, याबद्दल मला खूप खंत आहे. मी जो असायला हवा होतो, तसा मी राहू शकलो नाही, ही माझी चूक आहे. यात कुणाचाही दोष नाही, फक्त माझाच आहे. मी सगळ्यांना त्रास दिला, कुणालाही आनंदी ठेवू शकलो नाही, फक्त दुःख दिलं ही माझी चूक आहे. माफ करा. आय लव्ह यू.
प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने
छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आला आहे. यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचे समोर आले आहे. आईचे ११ तोळे दागिने आणि एक लाख ५५ हजाराची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रेयसीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगेश विलास आणि १९ वर्षीय तरुणी असे आहे. मंगेशचा मित्र कुणाल केरकरला देखील पोलिसांनी अटक केली आहे.