संग्रहित फोटो
शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पारोडी (ता. शिरुर) येथील एका डेअरीच्या ऑफिसची कडी वाजवली. दरवाजा उघडल्यानंतर चोरट्यांनी एकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डेअरीच्या ऑफिस मधील साहित्यांचे नुकसान करत लाखोंची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन मध्ये तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोडी (ता. शिरुर) येथे राहुल ढमढेरे यांची गगनगिरी मिल्क प्रोडक्ट नावाने डेअरी असून, सदर ऑफिसमध्ये राहुल यांचे वडील माणिकराव झोपलेले असताना रात्रीच्या सुमारास कोणीतरी कडी वाजवल्याने माणिकराव यांनी कडी उघडली असता तिघा अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये येत माणिकराव यांना ढकलून देऊन त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून धक्काबुक्की केली, दरम्यान तिघांनी ऑफिस मधील साहित्यांची तोडफोड करत ऑफिस मध्ये ठेवलेली चार लाख एकोणीस हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला,
घडलेल्या घटनेबाबत राहुल माणिकराव ढमढेरे (वय ४२ वर्षे रा. पारोडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी, वाहतूक पोलिसांचे आदेश; कारण…
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परदेशी चलन चोरीला
कोंढव्यातील किराणा माल विक्री दुकानात ठेवलेले परदेशी चलन चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात २९ वर्षीय किराणा माल विक्रेते तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे कोंढव्यात रॉयल बालाजी ट्रेडर्स किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील २०० सौदी रिआल आणि २०० अमेरिकन डॉलर चोरुन चोरटे पसार झालेत. सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर अध्क तपास करत आहेत.