जिंतूर मध्ये कीर्तन वरून परत येताना तीन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे (फोटो - सोशल मीडिया)
या प्रकरणी नवनाथ विश्वनाथ कदम त्यांच्या फिर्यादीवरून कार (एम एच २९ बीव्ही ७७९०) च्या चालकाविरोधात परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (दि.१०) पहाटे २ वाजण्याच्या सुमारास झरी ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावरील इझरी समोर दोन किलोमिटर अंतरावर रोडवर ही दुर्घटना घडली. यातील कार (एम.एच.२९ बीव्ही ५ ७७९०) च्या चालकाने समोरुन राँग साइडने येऊन त्याच्या ताब्यातील वाहन हे बेदरकारपणे, हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर चालवत असलेल्या मोटार सायकल क्रमांक एमएच-२२ एएक्स-९५७६ ला समोरुन जोराची धडक दिली. यामुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा : स्वप्न पाहणाऱ्यांना मतदार जमिनीवर आणणार? नांदेडमध्ये निवडणुकीचा उत्साह शिगेला
त्यावरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास सपोनी आडके यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान अपर पोलीस अधिक्षक सिराज गुंजाळ, उपविभाग परभणी ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रत वाहनांची पाहणी केली.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी 20 वर्षे का लागली? राज-उद्धव यांची बेधडक संयुक्त मुलाखत चर्चेत
बोर्डी व मूडा गावावर शोककळा
माऊली कदम, दत्ता कराळे, प्रसादराव कदम हे तिघे परभणी तालुक्यातील पिंपळा येथील कीर्तन कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री एकच्या सुमारास कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने परभणी- जिंतूर मागनि बोर्डी गावाकडे निघाले. दरम्यान, झरी जवळील लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येताच त्यांच्या दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे बीट जमादार शंकर हाके यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना परभणी येथे रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिघांना मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच बोर्डी व मूडा गावावर शोककळा पसरली.






