सातारा डॉक्टर प्रकरणात एसआयटी स्थापन (फोटो- सोशल मीडिया)
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी होणार
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार नेतृत्व
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते आदेश
Tejaswi Satpute: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे याचा तपास देण्यात आला आहे.
महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत. तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू करावा असे आदेश देण्यात आल्याचे समजते आहे. तसेच लवकरात लवकर या घटनेचा अहवाल एसआयटीने सादर करण्याच्या सयचणा देण्यात आल्या आहेत.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयपीस अधिकारींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Satara Doctor Death Case: फलटण प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
बदनेच्या चौकशीसाठी गोरेंच्या जवळच्या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे. या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार मेहबूब शेख यांनी केला आहे.






