केरळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. हत्या केल्यानंतर ही घटना अपघात असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. शिव शंकर पात्रा असं आरोपी तरुणाचं नाव असून मृत महिलेचं नाव प्रियंका असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी हा भारतीय रिजर्व बटालियन (IRB) मध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ओडिशाच्या कोरापुट टाउमधील ओएमपी कॉलनीत घडल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, ८ ओक्टोम्बरच्या रात्री आरोपी पती आणि पीडित पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की शिव शंकरने रागाच्या भरात लोखंडी रॉडने आपल्या पत्नीच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी, पीडित मुलगी जागीच बेशुद्ध झाली. त्यानंतर, आरोपीने पुरावे मिटवण्यासाठी गॅस सिलेंडरची पाईप खोलून घरात आग लावली आंबी आग लागल्याच्या काही मिनिटानंतर शिव शंकर शेजाऱ्यांसोबत त्याच्या घरी पोहोचला आणि आपल्या पत्नीला वाचवण्याचं नाटक करू लागला. फायर ब्रिगेडच्या टीमने घरातील आग विझवली आणि त्यानंतर, प्रियांकाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. आरोपी ही हत्या अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला असता तिथे बरेच संशयास्पद पुरावे आढळून आले. पोलिसांना समजले की ही घटना एक सामान्य अपघात नसून हत्या आहे.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीची चौकशी केली. त्याच्या जबाबात बऱ्याच संशयास्पद बाबी समोर आली आहे. अखेर, कठोर चौकशीदरम्यान आरोपीने त्याचा गुन्हा काबुल केला. पोलिसांनी आरोपीला पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिली तक्रार
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुम्ही लायकीत राहा, नाहीतर हातपाय तोडून…; बारामतीत कंपनीतील कामगारांना दांडक्याने मारहाण