बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून गरोदर महिलेसह कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत गरोदर असलेल्या महिलेच्या बाळाचा दुर्दैवी मृत्य झालं आहे. बुलढाण्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. धक्कदायक म्हणजे पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून दोघांना मारहाण; तरुणावर लोखंडी रॉडसह चाकूने हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सम्राट चौकात भाजीपाल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून गंभीर घटना घडली आहे. विजय गावंडे, त्यांचा मुलगा गौरव गावंडे तसेच पत्नी आणि मुलगी यांनी फिर्यादी कुटुंबाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीचे कपडे फाडण्यात आले. तर दोन महिन्याच्या गरोदर महिलेला पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात बाळाचा दुर्दैवी मृत्य झाला आहे.
पोलिसांनी केली टाळाटाळ
या प्रकरणाची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी तक्रारदारांना तब्बल तीन तास बसवून ठेवले, असे आरोप फिर्यादीच्या ककुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर गरोदर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे.
आरोप काय?
दुसरीकडे गावंडे कुटुंबाच्या मारहाणीतून आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच ही जीवघेणी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींवर तसेच दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता फिर्यादी भोजने कुटुंबीयांकडून होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जमिनीच्या वादातून मुलानेच केली आई- वडिलांची हत्या
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुलानेच आपल्या जन्मदात्या आई वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले आहे. हि घटना शनिवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मृतकाचे नाव महादेव त्रबंक चोपडे, (वय 70) वर्ष) व कलावती महादेव चोपडे (वय 65 वर्ष) असे आहे. तर आरोपी मुलाचे नाव गणेश महादेव चोपडे असे आहे.