बीड जिल्ह्यातून सतत गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. पण आता पोलिसच धमकी देत असेल तर. बीड मधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पोलिसाने रागाच्या भरात शेतकऱ्याला धमकी दिली. “तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो” असा धमकीवजा इशाराच पोलिसाने शेतकऱ्याला दिल्याचा समोर आला आहे. याचा एक व्हडिओ देखील वायरल झाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे?
कौटुंबिक वादातून दोघांना मारहाण; तरुणावर लोखंडी रॉडसह चाकूने हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर
नेमकं प्रकरण काय आहे?
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानडी घाट परिसरात पवनचक्की प्रकल्पासाठी विद्युत टॉवर उभारण्यात आला आहे. पण या टॉवरखालील काही नट-बोल्ट स्थानिक शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचं माहिती उघड झाली. या पाहणी करण्यासाठी पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणीसाठी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी टॉवरचे नटबोर्ड काढून टाकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. नट बोल्ट काढल्याने टॉवर कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर त्यांनी 12 वर संपर्क साधत पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. पण यादरम्यान, काही शेतकऱ्यांनी पवनचक्की कर्मचाऱ्यांना हे नट बोल्ट लावू देण्यास नकार दिला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. हे नटबोर्ड नेमकी कोणी काढले आणि कशासाठी काढले? हे तपास करत असताना हे शेत तुझं आहे का? सातबारा दाखव, असं पोलिसांनी शेतकऱ्याला विचारलं. तेव्हा पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी रागाच्या भरात शेतकऱ्याला धमकी दिली. “तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो” असा धमकीवजा इशाराच पोलिसाने शेतकऱ्याला दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
तपासानंतर गुन्हा दाखल होणार?
या घटनेनंतर शेतकऱ्यांनी संबंधित पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने टॉवरवरील नट कोणी काढले याचा तपास सुरू केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र धमकी दिलेल्या पोलिसावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या व्हिडिओमुळे प्रशासन आणि शेतकऱ्यांमधील तणावाचं वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
Rajsthan Crime News: पाकिस्तानी ISIसाठी गुप्तहेरी; राजस्थान गुप्तचर विभागाकडून मंगत सिंगला अटक