सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या
नेमकं घडलं काय?
भांडुपमधील ३० वर्षीय पीडित तरुणीची जानेवारी २०२३ मध्ये इंस्टाग्रामवरून शैलेशशी ओळख झाली. लाखो फॉलोवर्स आणि हायप्रोफाईल जीवनशैली पाहून ती त्याच्या प्रभावाखाली गेली. लवकरच त्याने तिच्याशी फोनवर बोलणे सुरू केले आणि प्रेम व्यक्त केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये वाशी येथे त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यानंतरच्या भेटींमध्ये त्याने लग्नाची मागणी करत तिच्या आईशीही चर्चा केली. यामुळे मुलीचा विश्वास आणखीनच वाढला.
शैलेशने फोटोशूटसाठी पैसे हवे असल्याचे सांगत सुरुवातीला दीड लाख रुपये घेतले. नंतर तिला BMW कार घेण्याचे स्वप्न दाखवत तिच्याच नावाने कार बुक केली आणि डाउन पेमेंट, टोकन मनी, डीलरला एनईएफटी अशा मिळून सुमारे ९ लाख रुपये घेतले. पुढे वडिलांचे आजारपण, नवीन कंपनी सुरू केल्याचे कारण देत त्याने पुन्हा पुन्हा पैसे मागितले.
फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुलीने त्याला एकूण २७ लाख रुपये दिले. त्यापैकी फक्त ५ लाख परत केले. दरम्यान, ठाण्यात दुसऱ्या मुलीने फसवणुकीची तक्रार केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. जेलमधून बाहेर आल्यानंतरही त्याने लग्नाच्या बहाण्याने मुलीची दिशाभूल सुरू ठेवली.
ती भांडुप पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोहोचताच शैलेशने ३ लाख रुपये परत दिले, मात्र उर्वरित रकमेबाबत टाळाटाळ केली आणि गायब झाला. नोव्हेंबरमध्ये विष्णूनगर पोलिसांनी त्याला दुसऱ्या प्रकरणात अटक केली. याची माहिती मिळताच पीडित तरुणीनेही तक्रार दाखल केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले.
सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त
Ans: IT इंजिनीअर मुलीची प्रेमाच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक केल्याचा आरो
Ans: फोटोशूट, BMW कार बुकिंग, वडिलांचे आजारपण व नवीन कंपनी अशा कारणांनी पैसे घेतले.
Ans: भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून शैलेश न्यायालयीन कोठडीत आहे.






