पुणे जिल्ह्यातील जेजुरी तालुक्यातील मावडी गावात दोन भावांमध्येच भांडण झाली. शेतात जायला वाट दिली नाही म्हणून सक्ख्या भावानेच दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत स्वतःच्याच भावाचा जीव घेतला. अनेक वर्षांचा जमिनीचा वाद भावाच्या जीवावर उठला आणि एका भावाने काही क्षणात दुसऱ्या भावाचा काटा काढला. चांगदेव भामे आणि ज्ञानदेव भामे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमीन वाट्याचा वाद सुरु होता.
हडपसर पोलिसांची विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई; फक्त 24 तासात…
१ तारखेला शेतात ज्ञानदेव भामे (वय वर्ष ८२) यांचा मृतदेह शेतात आढळून आला. सगळ्यांना वाटलं हा नैसर्गिक मृत्यू असेल मात्र जमिनीच्या वादाच्या संशयातून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि २४ तासातच आरोपीचा शोध लावला. घडल्या घटनेची चांगदेव भामे यांनी कबुली दिली आहे. शेतात जायला वाट नसल्याने चांगदेव भामे हा आपल्या भावाकडे शेतातून वाट मागत होता. मात्र ज्ञानदेव भामे यांने त्याला विरोध केला आणि या रागातूनच त्यांना आपल्या भावाचा काटा काढायचा ठरवला.
कसा केला भावाचा खून?
ज्ञानदेव भामे शेतात गेले असता दांडके आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीतच भावाचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानदेव भामे यांचा मृतदेह शेतात तसाच पडून होता. मोठ्या भावाचा खून केल्याने जेजुरीतला परिसर हादरून गेला आहे. भावानेच भावाचा खून केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, भावाचा वाद हा भावाच्या जीवावर उठला. पोलिसांनी चांगदेव भामेला ताब्यात घेतला आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
भावाभावांनी जमिनीचा वाद टाळावा
अनेक गावात भावाभावांच्या जमिनीच्या वादाच्या घटना ऐकायला मिळत असतात. एकाच आईच्या असलेले दोन लेकरं एकमेकांच्या जीवावर उठतात. आजकाल पैश्याच्या हवासा पायी भावभावांमधल प्रेम कमी होत चाललं आहे. घरातल्या घरात आवण वाद मिटवू शकतो. त्याला खून करण्याची गरज काय. जेजुरीतल्या या घटनेनं कुटुंबातलं प्रेम,संवेदना , आपुलकी, भावना बोथट झाल्यात हेच पाहायला मिळालं.
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला
बीडमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलीला पाईपने मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
Mumbai Crime News: तीन हजाराच्या कर्जापायी मुलगी ठरली ऑनलाईन मॉर्फिंगचा बळी