केरळ: आपल्या देशात अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये म्हणून अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. विशेषतः महाराष्ट्र कायदा ही करण्यात आला आहे. मात्र केरळ राज्याला आपण साक्षर राज्य म्हणून ओळखतो मात्र त्याच राज्यात धक्कादायक अशी घटना घडली आहे. केरळच्या कोट्टायममधे तरुणीच्या अंगात भूत शिरल आहे म्हणून तिला मांत्रिकाकडे नेण्यात आल. त्या नंतर मात्र तिचा जो तासांतास मानसिक छळ आणि शारीरिक छळ करण्यात आला त्याने तुमच्या अंगावर काटा येईल.
तरुणीसोबत नक्की काय घडलं ?
तिच्या अंगात भूत आहे ते काढायचं आहे म्हणून तिला मांत्रिकाकडे नेण्यात आल. तिला सुरुवातीला दारू पाजण्यात आली. सिगारेट पण पाजण्यात आली. सिगारेटचे चटके तिच्या अंगाला देण्यात आले. या सगळ्या प्रकारात फक्त तिचा जोडीदार नाही तर त्याचे कुटुंबातील सदस्य हे सहभागी होते. भूत काढण्याच्या नावाखाली तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. जेव्हा मुलीच्या घरच्या वडिलांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि या प्रकारात जोडीदाराच्या घरच्या सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाई कोणावर केली ?
या घटनेत तिचा जोडीदार अखिल दास ( वय २६ ) त्याचे वडील आणि मांत्रिक याच्यावर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांत्रिकाला सकाळी ११ वाजता घरी बोलवण्यात आल आणि रात्री उशिरा पर्यंत यांच्याकडून विधी सुरू होता. विधीच्या नावाखाली तिला चटके देण्यात आले. दारू पाजण्यात आली आणि या प्रकारात ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला दवाखान्यात दाखल करण्यात आल. तिच्या वडिलांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी तातडीने धाव घेतली. आणि कुटुंबातील सदस्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज आपण २१ व्या शतकात जगत असताना पण अशा अंधश्रद्धा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशाने मानसिक आणि शारीरिक त्रासात जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळच्या या घटनेने अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे याचा प्रत्यय येतो.
Ans: केरळ
Ans: अखिल
Ans: मांत्रिक






