लोटे गुरुकुलात 'रॅगिंग'चा नवा वाद (Photo Credit- X)
खेड (रत्नागिरी): खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक गंभीर वाद निर्माण झाला आहे. या गुरुकुलातील एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर, जो वर्गाचा मॉनिटर आहे, त्याने इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वर्गाचा हा मॉनिटर इतर विद्यार्थ्यांचे आपल्या मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ काढायचा आणि त्यांना त्याद्वारे ब्लॅकमेल करत होता. याशिवाय, हा अल्पवयीन मॉनिटर गुरुकुलातील काही विद्यार्थ्यांना व्यसनजन्य पदार्थांचे सेवन (नशा) करण्यास भाग पाडत होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याचे पालक, चंद्रकांत हुलगप्पा धोत्रे (ता. चिपळूण) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, त्या अल्पवयीन मॉनिटरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२५ मध्ये घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत फटाक्यांचा बेफाम खेळ! रस्त्यावर हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणा प्रकार
या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०३१५/२०२५ असा गुन्हा भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ७४, ७९, १३१, ३५२, ३५१(२) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गेल्या आठवड्यातच या गुरुकुलाचे प्रमुख ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्यावर विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या प्रकरणी पोक्सोचे (POCSO) दोन गुन्हे दाखल झाले आहेत. कोकरे महाराजांना न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रमुख महाराजांवरील पोक्सो प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून ‘रॅगिंग’सारखा हा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकरणामुळे गुरुकुलाच्या कार्यपद्धतीवर आणि प्रशासनावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या पुढील कठोर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या… , काकांनी केला 3 वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगातून रक्त अन्…