नवऱ्याने केली बायकोची हत्या (फोटो- istockphoto)
सोलापूर: देशभरातून हल्ली गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाह झालेल्या एका कुटुंबाबाबत ही महत्वाची घटना समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवऱ्याने आपल्या बायकोचा गळा आवळून खून केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावात गंभीर घटना घडली आहे. नवऱ्याने आपल्या बायकोची चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला आहे. नवऱ्याने बायकोची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेत आपले देखील जीवन संपवले आहे. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.
दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. आषाढी एकादशीनिमित्त त्यांचे कुटुंब बाहेर गेले होते. ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. तसेच सोलापूरसह महाराष्ट्रात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पतीने आपल्या पत्नीची चार्जरच्या वायरने गळा दाबत हत्या केली. त्यानंतर नवऱ्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र पत्नीचा खून करण्यामागे आणि पतीने देखील जीवन का संपवले आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, तपास सुरू केला आहे.
सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुकानदाराने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेत आता धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राम फाटले असे आहे.
नेमकं काय प्रकरण?
राम फाटले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये १० टक्के व्यंजनाई उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुच्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड. असे सावकाराने म्हंटले. राम फाटले यांचा सावकाराने वेळोवेळी मानसिक छळ केला. याच मानसिक त्रासाला कंटाळून राम फाटले यांनी आपली जीवन यात्रा संपवली.