Crime News Live Updates
29 Aug 2025 02:25 PM (IST)
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी आहे. हा बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकीत अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. अमोल गायकवाड हा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
29 Aug 2025 02:10 PM (IST)
परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. हत्या करण्याआधीच त्याने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव विद्या विजय राठोड असे आहे.
29 Aug 2025 01:40 PM (IST)
दोन दिवसापूर्वी नांदेड येथे ऑनर किलिंगची घटना समोर आली होती. जन्मदात्या वडिलानेच आपल्या लेकीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकल्याची समोर आली होती. आता याच प्रकरणातील आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या धक्कदायक व्हिडीओने हत्या करणयात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याचं दिसून येत आहे.
29 Aug 2025 01:21 PM (IST)
नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव दिवाणशु मेरावी असे असून तो पाचपावली ठक्करग्राम येथील रहिवासी आहे. आरोपीवर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम चार अंतर्गत आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
29 Aug 2025 01:00 PM (IST)
दुचाकीने चुकीच्या बाजुने येऊन कार चालकाचा रस्ता आडवून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत चालकाचे नाक फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना खडकी येथील एलफिस्टन रोडवरील गुरूद्वारा समोर घडली. याप्रकरणी चौघांना खडकी पोलिसांनी अटक केली. याबाबत सत्यम सुखसागर भार्गव (२९, रा. खराडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
29 Aug 2025 12:40 PM (IST)
मध्यभागातील म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दारू आणि वाईन शॉपीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील पारित केले होते. मात्र, निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने पूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत. त्यानूसार सुधारित आदेश काढण्यात आला आहे.
29 Aug 2025 12:20 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील नामांकित हॉटेल ‘पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट’चे मालक संतोष शेट्टी (वय ४५) यांचा त्यांच्याच हॉटेलातील कामगाराने रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा घडली आहे. किचनमधला चाकू आणत तो अचानक त्यांच्या पोटात घुपसून व वार करून खून केला आहे. बेसावध असल्याचे पाहून त्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
29 Aug 2025 12:00 PM (IST)
राज्यासह देश आणि विदेशातून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेकजण पुण्यात येत असतात. गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था ठेवणे तसेच गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अनेक गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, खराडी, वाघाली, लोणीकंद व चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ सराइतांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले.
29 Aug 2025 11:42 AM (IST)
. पुणे शहरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, फुरसूंगी तसेच वानवडीत बंद फ्लॅट फोडत दहा लाखांचा ऐवज लांबविला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत असताना पोलिसांना मात्र, या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. पहिल्या घटनेत फुरसूंगीत एका इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅटच्या बेडरुमधील स्लायडींगच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोकड असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी मयुर अग्रवाल यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. मंतरवाडी उरूळी देवाची येथे अग्रवाल हे राहण्यास असून, ते घराला कुलूप लावून गेल्यानतंर चोरट्यांनी घरफोडी केली. दुसरी घटना घोरपडी येथील सोपानबाग येथील एका सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून चोरट्यांनी ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ७८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ही घटना २१ ते २७ ऑगस्ट या काळात घडली आहे.
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा 28 वा अटक आरोपी आहे. अमोल गायकवाडचा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. तर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकितही अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.