शहरातील विश्रामबाग परिसरातील ‘बिलेनियर’ कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील कॅफे संस्कृती, त्याठिकाणी अल्पवयीन मुलांना मिळणारा प्रवेश आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शहरातील विविध कॅफेंवर पाहणी करण्यात आली. कॅफेच्या नावाखाली बंदिस्त कंपार्टमेंट तयार करून त्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अल्पवयीन मुला-मुलींना सहज प्रवेश मिळत असल्याने हा प्रकार अधिक गंभीर असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संघटनेच्या मते, गेल्या काही वर्षांत शहरातील काही कॅफेंबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. यापूर्वीही अशाच घटनांनंतर काही कॅफेंविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.
विश्रामबाग परिसरातील ‘बिलेनियर’ कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित संशयित समर्थ अनिल देवकुळे (रा. रविवार पेठ, माधवनगर) अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीची ओळख झाल्यानंतर आरोपीने जानेवारी २०२६ मध्ये त्याने या कॅफेमध्ये तिला भेटायला बोलावले. कॅफेमध्ये कोणी नसल्याचे पाहून त्याने दरवाजा बंद करून पीडितेशी लगट केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, जबरदस्तीने अश्लील चित्रफीत बनविल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शहरातील कॅफेंच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही कॅफेंमध्ये बंदिस्त कंपार्टमेंटची व्यवस्था, परिसरात वापरलेले कंडोम आढळल्याचा दावा, गर्भनिरोधक गोळ्यांची रिकामी पाकिटे, अल्पवयीन मुला-मुलींची वर्दळ, संशयास्पद हालचालींबाबत स्थानिकांकडून तक्रारी असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानी यांनी केला आहे.
“कॅफेच्या नावाखाली काही ठिकाणी सुरू असलेल्या प्रकारांबाबत आम्ही अनेक वेळा आवाज उठविला आहे. अल्पवयीन मुलांना अशा ठिकाणी सहज प्रवेश मिळत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. पोलिस प्रशासन, महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून अशा कॅफेंची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र आहेत आणि आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होऊ शकते.” नितीन चौगुले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान
चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त






