Sadhus Protest Rahul Gandhi Residence: राहुल गांधींच्या दिल्लीतील निवास्थानाबाहेर साधू-संतांचे तीव्र आंदोलन
Sadhus Protest On Rahul Gandhi Residence: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर साधू आणि संतांसह अनेक नागरिकांनी आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनाची माहिती मिळताच, दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करणाऱ्या अनेक साधू आणि संतांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या शुक्रवारी सकाळच्या सुमारास साधू आणि संतांसह अनेक आंदोलक अचानक राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दाखल झाले. आंदोलकांनी काँग्रेस पक्षाविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि आंदोलन केले. परिस्थिती पाहून दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
साधु संतांच्या वेशातील काही आंदोलक अचानक राहुल गांधीच्या निवासस्थानाबाहेर जमल्याने परिसरात काही काळासाठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्थाही वाढवली. प्राथमिक माहितीनुसार, राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलक नेमके कशासाठी आंदोलन करत होते आणि त्यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
साधुसंतांना आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर केल्यानंतर, एका आंदोलकाने म्हटले, “मी काँग्रेस पक्षाला शाप देतो. आम्ही ५६ वर्षे या पक्षासा आमचे रक्त आणि घाम गाळला आहे, आणि आता तो आम्हाला बाहेर काढत आहे. राहुल गांधी, तुम्हाला लाज वाटायला हवी.”
काही दिवसांपूर्वी, बिहारचे खासदार पप्पू यादव यांनीही संसद परिसरात संताच्या वेशात आंदोलन केले होते. त्यांचे हे आंदोलन अयोध्येतील राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि अर्पणांमधील गैरव्यवहारांच्या आरोपांशी संबंधित होते. या आंदोलनात अनेक विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते आणि काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या साधुसंतांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याचे बोलले जात आहे. या निदर्शनांमागील आंदोलकांचा हेतू आणि त्यांच्या मागण्यांविषयी पोलीस किंवा इतर कोणत्याही अधिकृत पक्षाने अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही.
बिहारच्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी पत्रकार परिषदेत त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. आज सकाळपासून त्यांना धमकीचे चार फोन आल्याचा दावा पप्पू यादव यांनी केला आहे.






