दोन जुळ्या मुलांना आईनेच जिवानिशी मारले (फोटो- istockphoto)
पुणे: आईच्या क्रुरतेने पुन्हा पुणे हादरले आहे. लग्नाच्या दहा वर्षानंतरही मूल होत नसल्याने तिने टेस्टट्युबद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. पण, त्या मुलांची वाढ मात्र योग्य होत नसल्याच्या नैराश्यातून आईने त्या दोघांना पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात ही घटना घडली असून, मुलांना मारल्याने आईने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पोलिसांनी आईला मंगळवारी रात्री उशीरा अटक केली. जुळ्या मुलांची हत्या केल्याप्रकरणी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय ३५, सध्या रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता, मूळ रा. मिरजवाडी, आष्टा, जि. सांगली) हिला अटक केली आहे. याबाबत प्रल्हाद लक्ष्मण गोंडे (रा. काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
https://x.com/phatak789/status/1909883586037133641?t=v9cjwaugtBbRwExNz9CBbQ&s=08
7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात वेळेवर उपचार न् मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान सोलापूरमध्ये देखील माणुसकीला काळिमा फसणारी घटना घडली आहे. सोलापूरमध्ये असलेल्या तुळजाई नगरमध्ये एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सोलापूरमध्ये 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आणि विशेष म्हणजे चार ते 5 महिलांनीच या महिलेला मारहाण केल्याचे म्हटले जात आहे. मात्र अशी मारहाण का करण्यात आली यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूरमध्ये माणुसकीला काळीमा! 7 महिन्यांच्या गर्भवतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेची प्रकृती…
पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात मधली घटना काय?
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी कएलोयचा आरोप त्यांच्यावर होता.