आजकाल साइबर चोरटे या ना त्या कारणाने अनेकांना गंडा घालताना पाहायला मिळतात. डिजिटल व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका अभिनेत्रीला अशाच एका व्यक्तीने कॉल केला. आपल अकाउंट ज्या सिम कार्डला लिंक आहे त्यावरून गैरव्यवहार सुरू असल्याचा त्यांना कॉल आला. जर तुम्ही त्या खात्यात ६ लाख भरले नाहीतर तुमचा पासपोर्ट गोठवला जाईल अशी धमकीही त्यांना देण्यात आली. दिल्लीतून एका ऑफिसरचा कॉल येईल अस सांगत तिची फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला ती अभिनेत्री घाबरली होती मात्र थोड्या वेळात तिला आपली फसवणूक झाली त्या नंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात तत्काळ धाव घेतली आणि आपली तक्रार नोंदवली आहे.
कसा घातला गंडा ?
ही अभिनेत्री नुकतीच पश्चिम बंगालवरून मुंबईत आली होती . तिला एक कॉल आला आणि बँकेच्या फसवणूक प्रकरणात तुम्हाला अडकवू अस सांगण्यात आल. जर तुम्ही तत्काळ पैसे भरले नाहीत तर तुम्हाला डिजिटल अरेस्ट होईल आणि तुमचा पासपोर्ट पण गोठवला जाईल. तुम्हाला एक कॉल येईल त्या नंबर वर सुरुवातीला पैसे भरा आणि चौकशी झाल्यावर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील अस सांगण्यात आल. मात्र एका एप वरून तिला कॉल आणि तो कॉल स्पैम असल्याचं कळल्यावर तिची फसवणूक झाली आहे. अस तिच्या लक्षात आल आणि तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या अभिनेत्रीला जवळपास ६ लाखाला गंडा घातला आहे.
या प्रकारापासून कस वाचाल ?
जर तुम्हाला ऑनलाईन धमकीचे कॉल येत असतील किवा मेसेज येत असेल तर आधी खात्री करा. घाबरून न जाता पोलिसांत थेट तक्रार करू शकता. पोलिसांच्या माध्यमातून तुमचा हा गैरव्यवहार रोखला जाऊ शकतो. जर अभिनेत्रीला अशा पद्धतीने गंडा घातला जात असेल तर सर्वसामान्य लोकांच काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मुंबई पोलिसांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. हे मोठ रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…
नवीमुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र या घट्नेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Kolhapur Crime: 6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; हाताच्या नसा कापल्या अन्…; कारण काय?