उल्हासनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रावर गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून काही गुन्हेगारांनी व्यापाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना उल्हासनगर कॅम्प ३ मधील जसलोक शाळेजवळ घडली. व्यापारी विजय सकट यांनी काही दिवसांपूर्वी ओम राजपूत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी रोहन रेडकर, सुनिल उर्फ काली सिंग लबाना आणि सुरज शुक्ला यांनी रात्रीच्या वेळी बियरच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून सकट यांच्या घरावर फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. घटनेनंतर मध्यवर्ती पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून कल्याण-अंबरनाथ रोडवरील डी मार्ट परिसरातून सुनिल लबाना आणि सुरज शुक्ला या दोघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.