पाली : देशभरात गुन्हे होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीनं लिव्ह-इनमध्ये पार्टनरची (live partner murder) हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आता राजस्थानमध्ये सर्वांचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पाली जिल्ह्यात जंगलात शेळ्या चारणाऱ्या वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. (Pali Murder News) एवढेच नाही आरोपीने मृत महिलेलं मांसही खाल्लं. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे
[read_also content=”धक्कादायक! फरशी फोडली, ६ फूट जमीन खणली…नंतर बॉक्समधून बाहेर काढला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह https://www.navarashtra.com/crime/brazilian-actor-jefferson-machado-missing-from-4-month-found-dead-inside-buried-wooden-box-nrps-405055.html”]
26 मे रोजी दुपारी जंगलात शेळ्या चरत असलेल्या लोकांनी एक व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत तोंडावर रक्त माखलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली असून तो व्यक्ती तिच्या चेहऱ्याचे मांस खात असल्याचे समजले. त्याचा चेहरा रक्ताने लाल झाला होता. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. हे पाहून आरोपी पळून गेला. गावकऱ्यांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडून सेंद्रा पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी तरुणाला पकडून पोलिस ठाण्यात आणले. पोलिस तपासात या तरुणाचे नाव २४ वर्षीय सुरेंद्र असून तो मुंबईचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
नेहमीप्रमाणे सारधना गावात राहणारी एक वृद्ध महिला शांती देवी शेळ्या चरण्यासाठी जंगलात गेली होती. यादरम्यान तरुणाने जंगलात मोठ्या दगडाने महिलेवर हल्ला करून तिचे डोके फोडले. अनेकवेळा दगडांनी वार केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तरुणाने मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस खाल्ले. यानंतर आरोपी तरुणाने स्वतःचा शर्ट काढून मृत वृद्ध महिलेचा चेहरा झाकला. हत्येनंतर या आरोपीनेदाताने महिलेच्या तोंडाचे मांस खाल्याचेही पोलिसांनी सांगितले. सध्या या वृद्ध महिलेच्या मृतदेह सेंद्रा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या वृद्ध महिलेची निर्घृण हत्या का करण्यात आली? आणि मुंबईतील तरुण जंगलात काय करायला आला? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.