'तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो' असे स्टेट्स ठेवणाऱ्या तरूणाची भरदिवसा हत्या; गावठी कट्ट्याने केले 12 राउंड (संग्रहित फोटो)
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता हिंगोलीच्या पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणाची गावठी कट्ट्याने 12 राउंड फायर करून हत्या केली. भरदिवसा झालेल्या या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली.
आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाळूचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणाच्या शरीराची मारेकऱ्यांनी अक्षरशः गोळ्यांनी चाळणी केली. भरदिवसा घडलेल्या सिनेटाईल थरारानंतर मारेकरी पसार झाले.
हल्ल्यापूर्वी ठेवलेले स्टेट्स चर्चेत
दोन दिवसांपूर्वीच आकाशने सोशल मीडियावर ‘शेठ, तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो, रोख आणि ठोक…’ असे व्हिडिओचे स्टेट्स ठेवले होते. त्याच अनुषंगाने मारेकऱ्यांनीही समोरुन येऊन गोळ्या झाडल्या. वाळूच्या वादातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती पुढे आली आहे.
आधी सेंट्रिंग काम, आता वाळूचा व्यवसाय
आकाश हा कुशल सेंट्रिग कारागिर होता. मात्र, आता तो वाळूचे काम करायचा. वाळूच्या वादातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी माहिती पुढे आली आहे. अविवाहित असलेल्या मृत आकाश मोरे याच्या परिवारात वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. या घटनेची पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पाहणी करून आढावा घेतला. यात कपाळावर एक, डोक्याजवळ एक, डोक्याच्या उजव्या बाजूला एक, उजव्या बाजूला कानाच्या वर एक, डोक्याच्या मध्यभागी दोन, डोक्याच्या मागील बाजूस दोन पाठीवर चार, एक छातीच्या उजव्या बाजूला अशा 12 गोळ्या झाडल्या.
भीतीमुळे शरण, एक मारेकरी अल्पवयीन
आकाशचा खून करून पसार झालेले दोघे मारेकरी शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास जामनेर पोलिसांत शरण आले. मृत्यूच्या भीतीपोटी आरोपी शरण आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. नीलेश अनिल सोनवणे व दुसरा मारेकरी अल्पवयीन आहे. दोघे दुचाकीने जळगावकडे निघाले होते. मात्र, त्यांच्या मागावर काही लोक असून मृत्यूच्या भीतीपोटी दोघांनी म्हसावद-नेरी मार्गे जामनेर पोलिस स्टेशन गाठले. पोलिस ठाण्यासमोरच उभे राहून पोलिस स्टेशन कुठे आहे? अशी विचारणा ते भेदरलेल्या अवस्थेत करत होते.