फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल (फोटो -)
नागपूर: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये गर्दी जमवली. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. दरम्यान फाहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फहीम खानसह अनेक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिंसाचारात अनेक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात बांग्लादेशी दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हा फहीम खान कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे.
हा फहीम खान कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. फहीम शमीम खानने जमाव जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. विशेष म्हणजे, तोच फहीम खान पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेला होता. नागपूर पोलिसांनी या प्रकरणात 51 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून, त्यात फहीम खानचे नाव प्रमुख आरोपींपैकी एक म्हणून समोर आले आहे.
Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड..; पोलिसांनी फहीम खानची कुंडलीच काढली
एफआयआरनुसार, फहीम खानने सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांना एकत्र करून पोलिसांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्याने विहिंप (विश्व हिंदू परिषद) आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतरही फहीम खानने पुन्हा जमाव गोळा केला आणि परिस्थिती अधिक तणावग्रस्त केली, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
फहीम खान हा 38 वर्षांचा असून, त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हिंसाचाराला प्रवृत्त करण्यासाठी त्याने लोकांना भडकवले आणि “पोलीस हिंदू समाजाचे आहेत, ते आपली मदत करणार नाहीत” असे सांगत आंदोलनकर्त्यांना उत्तेजित केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत फहीम खानने निवडणूक लढवली होती, मात्र त्याला पराभव पत्करावा लागला होता.
नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 मधील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना गरज नसताना घराबाहेर न पडण्याचा तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्याचा आदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जनजीवन सुरळीत असून, सार्वजनिक वाहतूक सेवा नियमित सुरू आहे. लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत असले तरी काही भागांमध्ये तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे.