मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. त्यानंतर दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. पेल्हार पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला पुणे येथून अटक केली आहे. हत्या करण्यात आलेल्या आरोपींची नाव गुडिया चमन चौहान आणि मोनू विश्वकर्मा असे आहे. मोनू हा गुडियाचा प्रियकर आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव विजय चौहान असे आहे. विजय आणि गुडिया या दाम्पत्याला चेतन चौहान नावाचा आठ वर्षांचा मुलगा देखील आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे. पती हा गुडिया आणि मोनू यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे दोघांनी मिळून विजयची निर्घृण हत्या केली. ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली असून, मृतदेह घरातच गुपचूप पुरून त्यावर टाईल्स बसवण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे मृताच्या भावाकडूनच टाईल्स लावून घेतल्या गेल्याचे समोर आले आहे.
विजय चौहानचा भाऊ त्याच परिसरात काही अंतरावर राहतो. तेव्हा तो शेवटचा १० जुलै रोजी विजय चौहानच्या घरी आला होता. त्यानंतर पत्नी चमन देवी यांनी त्याला सांगितले की विजय कुर्ला येथे काही कामावर आहे आणि सध्या तिथेच आहे. यादरम्यान त्याचा फोन बंद येत होता. 18 जुलै ला पुन्हा विजय चौहानचा भाऊ घरी आला. तेव्हा त्याला घराला कुलूप दिसले. त्याने शेजार्यांना विचारले असता चमन देवी बराच वेळ घरी आली नव्हती. त्यानंतर संशय वाढताच त्याने पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता विजयचा मृतदेह घरातच जमिनीखाली गाडलेला आढळला.
दोन दिवसांपूर्वी गुडियाच्या मोबाईलमध्ये संशयास्पद मेसेज आढळला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे. सध्या आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून, तिचा प्रियकर मोनू विश्वकर्मा फरार आहे. पोलिसांनी मृतदेह घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; तरुणीने केली आत्महत्या
दरम्यान, नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. जेव्हा आरोपी प्रियकराचे खरे रूप पुढे आले तेव्हा तिला धक्काच बसला. यामध्ये तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नागपूर येथील अजनी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.