नांदेड : दोन दिवसापूर्वी नांदेड येथे ऑनर किलिंगची घटना समोर आली होती. जन्मदात्या वडिलानेच आपल्या लेकीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकल्याची समोर आली होती. आता याच प्रकरणातील आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या धक्कदायक व्हिडीओने हत्या करणयात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याचं दिसून येत आहे.
फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात ऑनर किलिंगची घटना घडल्याचे समोर आले होते. मुलीचे लग्न वर्षभरा पूर्वीच झाले होते. तरीही ते आणि तिचा प्रियकराचा बोलणं सुरु होत. सोमवारी सासरचे मंडळी बाहेर गेले असता तिने आपल्या प्रियकराला फोन करून बोलावले. अचानक सासरचे मंडळी नको त्या अवस्थेत मुलीला सासरच्यांनी पकडले होते. विवाहित प्रेयसीच्या सासरी भेटायला गेलेल्या प्रियकराला सासरच्या मंडळींना नको त्या अवस्थेत पहिले. त्यानंतर मुलीच्या वडिलांना सांगण्यात आले. मुलीचे वडील, काका व आजोबांनी मुलीची सासरीच गावातून धिंड काढली. त्यांनतर त्या दोघांची हत्या करून दोघांचे हातपाय बांधून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकले. हत्या केल्यानंतर वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली आहे. मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला. या प्रकरणी वडील, काका आणि आजोबांना ५ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
वर्षभरापूर्वीच झालं होत लग्न, तरीही
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव संजीवनी कमळे (19, रा. गोळेगाव) व लखन बालाजी भंडारे (19, रा. बोरजुनी) असे आहे. बोरजुनी येथील मूळचे रहिवासी असलेल्या या दोघांचे गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. गेल्या वर्षी संजीवनी हिचा विवाह गोळेगाव येथील एका तरुणासोबत झाला होता. तरीही लपूनछपून या दोघांच्या गाठीभेटी, बोलणं सुरूच होतं. त्यांच्या प्रेमाला मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता. रात्री उशीरा दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मयत तरुणीचे वडील, काका, पती, सासू-सासरे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…