नेमकं प्रकरण काय?
मृत तरुणाचे नाव दुर्गेश सिंह ठाकूर (रा. मुतण्याळ, ता. बिलोली) असे आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रीशियन होता. दुर्गेश याचे थडीसावळी येथील नातलगातील एका विवाहित महिलेसोबत संबंध असल्याचा संशय होता. ही बाब महिलेच्या कुटुंबियांना समजताच संतापलेल्या नातेवाईकांनी ३ मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास दुर्गेशसिंहच्या घरी जाऊन त्याला जबरदस्तीने उचलून थडीसावळी येथे आणले.
त्यांनतर तिथे “आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस?” असा जाब विचारण्यात आला. आरोपींनी दुर्गेशसिंह आणि संबंधित महिलेला केबलच्या वायरने मारहाण केली. दुर्गेशसिंहच्या गुप्तांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यांनतर त्याला उलट्या होऊन तो जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सात जणांना अटक
पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेचा पती पद्मसिंह गंगासिंह ठाकूर याच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव राजूसिंह गंगासिंह ठाकूर, गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर (रा. थडीसावळी), तसेच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर (रा. निर्मल, तेलंगणा) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनतर थडीसावळी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
Ans: नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात.
Ans: विवाहित महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून मारहाण.
Ans: सात आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.






