नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) निक्की यादव हत्या प्रकरणी (Nikki Yadav Murder Case Update) दिल्लीच्या द्वारका न्यायालयाने (Dwarka Court) बुधवारी साहिल गेहलोतला (Sahil Gehlot) सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर (7 Days Police Custody) १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली. पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. साहिल गेहलोतला १४ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती.
प्रेयसी निक्की यादवची हत्या करून तिचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये (Dead Body In Refregrator) ठेवल्याचा आरोपी साहिल गेहलोत याला बुधवारी १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, असे आदेश मुख्य महानगर दंडाधिकारी अर्चना बेनिवाल यांनी दिले होते. तत्पूर्वी, दिल्ली न्यायालयाने सोमवारी गेहलोतच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. दिवस आणि अन्य पाच सह आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
[read_also content=”‘जे मूर्ख नाहीत त्यांच्यासाठी नोकरी!’ पिझ्झा मालकाने दिली नोकरीची ऑफर, ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांची सटकली आणि… https://www.navarashtra.com/viral/weird-jobs-for-those-who-are-not-stupid-pizza-owner-gave-job-offer-people-got-angry-after-seeing-the-post-nrvb-371399.html”]
सर्व आरोपींना आता ६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेहलोतने कथितरित्या निक्की यादवची हत्या केल्यानंतर, तिचा मृतदेह त्याच्या दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या ढाब्यावर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला आणि दुसऱ्या मुलीशी लग्न केले. गुन्हा घडल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे १४ फेब्रुवारीला म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला ही घटना उघडकीस आली.
[read_also content=”ऊठा ऊठा घरी जायची वेळ झाली, काम संपताच यंत्रणा दाखवते घरचा रस्ता! शिफ्ट संपल्यावर संगणक होतो आपोआप बंद, जाणून घ्या कुठे… https://www.navarashtra.com/technology/good-news-for-employees-the-system-shows-the-way-home-as-soon-as-work-is-over-the-computer-automatically-shuts-down-when-the-shift-is-over-nrvb-371395.html”]
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गेहलोतच्या नात्यातील दोन भाऊ आणि दोन मित्रांचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान असे उघड झाले की गेहलोतने ऑक्टोबर २०२० मध्ये यादवसोबत गुपचूप लग्न केले होते आणि पीडित मुलगी या लग्नासाठी सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी आरोपीवर दबाव आणत होती.