कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स
सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि पराठा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच कांदापोहे खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी लहान मुलांसह मोठेसुद्धा नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्यास मागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट वाटीभर पोह्यांचे नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही चिकन किंवा मिक्स भाज्यांचे नगेट्स खाल्ले असतील पण पोह्यांचे नगेट्स चवीला अतिशय सुंदर लागतात. पोह्यांचे नगेट्स तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा लहान मुलांच्या पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता. यामुळे मुलं सुद्धा खूप खुश होतील. लहान मुलांसह मोठ्यांना नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावेत, विकतच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी






