सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन (File Photo : Death)
अमरावती : मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येवती गावातील 65 वर्षीय वृद्धाने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.4) उघडकीस आली आहे. दयाराम दशरथ गाडे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
हेदेखील वाचा : ठाण्यात घरगुती वादातून एकाची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
याबाबत दयाराम यांचा मुलगा सचिन दयाराम गाडे (वय 33) याने माहिती दिली. त्यामध्ये त्याने सांगितले की, दयाराम गाडे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अमरावतीच्या एका मानसोपचार विशेषज्ञाकडे उपचारही सुरू होते. यापूर्वीही त्यांनी एक-दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, घटनेच्या वेळी दयारामची पत्नी आणि मुलगा मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते.
दयारामची सून प्रकृती स्थिर नसल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. अशात दयाराम घरी एकटे होते. त्यांनी घरी कोणी नसताना साडीचा फास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा घरचे लोक परत आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. याची तक्रार त्यांनी पोलिस पाटील संजय कावळे यांच्याकडे दिली. त्यांनतर मोर्शी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
ठाण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणांवरून खून, खुनाचे प्रयत्न आणि आत्महत्या यांसारखे प्रकार दिसून येत आहे. असे असताना ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. घरगुती वादातून एका व्यक्तीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
डॉक्टर महिलेची आत्महत्या
दुसऱ्या घटनेत, पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : पुण्यात डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण