शिक्षकांचा पगार रखडला (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवार यांना राज्यातील शिक्षकांचा पगार रखडला असल्याबाबत प्रश्न विचारला. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दर महिन्यास पगार मिळत असतो. पगार हा प्रत्येकासाठी नाजुक विषय आहे. दरम्यान शिक्षकांचा पगाराबाबत प्रश्न विचारला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्याना जागेवरच फोन लावला आणि याबाबत माहिती घेतली. अजित पवार हे पुण्यात बोलत होते.
अजित पवार यांना शिक्षकांचा पगार रखडला आहे, त्याबाबत प्रश्न विचारला असतं पवारांनी थेट अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला आणि याबाबत माहिती घेतली. पगाराचा निधी दिला गेला नाही का? यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळेस अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निधी दिला गेला असल्याचे सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कार्यशैलीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
दरम्यान जर पगार झाले नसतील, तर त्याबाबत तातडीने आवश्यक पावले उचलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पगार रखडले असतील तर शिक्षण सचिवांशी बोलतो. मात्र कोणाचेही पगार रखडता कामा नयेत, असे स्पष्टपणे सांगतो असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवारांनी तात्काळ केलेल्या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
बीड प्रकरणात कारवाई होणार: अजित पवार
बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि वाल्मिक कराडवरील खंडणीच्या आरोपांवरून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची टांकती तलवार आहे. बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवरून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षनेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. त्यावर आज अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? याबद्दल माध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं आहे. या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी सुरु आहे. तीन एजन्सी चौकशी करत आहेत. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई निश्चित होणार आहे. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा: Ajit Pawar On Dhananjay Munde : बीड प्रकरणात कारवाई होणार; धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांचं मोठं विधान
कोणत्याही चौकशीमध्ये उद्या कदाचित तुमच्यावरही आरोप होतील. त्यामुळे आता एसआटी, सीआयडी, न्यायाधीशांची चौकशी सुरु आहे. त्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. .या प्रकरणता जो कोणी दोषी असेल तो तिथं सिद्ध झालं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात मी देखील देवेंद्र फडणवीसांना भेटून सांगितलं आहे. माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यांना (सुरेश धस) मी सांगितलं आहे, नुसते आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणेला पुरावे द्या, असे पवार म्हणाले.