कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर एका युवकाचा मृत्यूदेह सापडून आला. या युवकाची डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. युवकाचा नाव उमेश मच्छिंद्र पाटील (वय २१, रा. श्रीनगर, मशिदीजवळ, कुपवाड ) असे आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने संशयित साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (वय २४, मूळ रा. बुलढाणा, सध्या रा. बामणोली), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (वय २०, रा. बामणोली) या दोघांना अटक करून अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
आधी मिरची पूड टाकली, नंतर मानेवर पाय ठेवला आणि…., पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश मच्छिंद्र पाटील ( वय २१) हा कुपवाड एमआयडीसीच्या ऐरावत पॅकेजिंग या कंपनीत सुपरवायजर म्हणून काम पाहत होता. संशयित आरोपी सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे हा देखील याच कंपनीत काम करत होता, उमेश आणि सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून धुसफूस सुरु होती. तसेच दोघांचा जोरदार वाद झाला होता. त्यामुळे सोन्याला उमेश्वर राग होता. याच रागातून त्याने साथीदार साहिल आणि अल्पवयीन युवकाच्या मदतीने उमेशचा काटा काढायचा ठरवले.
कशी केली हत्या?
उमेश शुक्रवारी सकाळी ९ वाजता कामावर गेला होता. कामावर जाण्यासाठी महिन्यापूर्वी नवीन दुचाकी (एमएच १० ईएन ६६०१) घेतली होती. रात्री नटराज कंपनीजवळ साहिल, सोन्या आणि अल्पवयीन मुलाने उमेशला अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. उमेश गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर पळाले.
यांनतर रात्री ९.४५च्या सुमारास उमेश पाटील याच्यावर हल्ला झाल्यानंतर कंपनीतील एका कामगाराने याबाबत उमेशच्या घरी जाऊन त्याच्या आईवडील आणि भावाला ‘उमेशला काहीतरी झाले आहे. तो नटराज कंपनीजवळ पडला असल्याचे सांगितले. उमेशचा भाऊ महेश त्या कामगाराच्या दुचाकीवर बसला आणि घटनास्तहली गेला. यावेळी उमेश पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यावर वार झाल्याचे दिसत होते. त्यावेळी उमेशच्या कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगार उपस्थित होते. महेश पाटील व कामगार जकाप्पा लवटे या दोघांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने रुग्णवाहिकेतून जखमी उमेशला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी उमेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरननी सांगितले. उमेशचा भाऊ महेश पाटील यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित साहिल खिलारी वन विभागाच्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सोन्या शिंदे व अल्पवयीन युवक अश्या तिघांनी खून केल्याची कबुली दिली. तिघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत उमेश आणि संशयित सोन्या यांच्या प्रेमाच्या त्रिकोणातून वाद झाला होता. उमेश हा सुपरवायझर असल्यामुळे तो सतत कामाला जुंपून स्वतः महिलेशी जास्त बोलत असल्याचा सोन्याला राग होता. त्यातून साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.
नाशिक हादरलं! डोक्यात कोयत्याने वार करून एकाची हत्या; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल