शिरूरमध्ये एका व्यक्तीची आत्महत्या (फोटो- istockphoto)
शिक्रापूर: शिरूरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. फायनान्सचे कर्ज मिळवून देण्यासाठी मॅनेजरने लाखो रुपये कमिशन घेऊन देखील कर्ज न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फायनान्स कर्मचाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती या. येथील संग्राम सातव यांची रबर कंपनी असल्याने त्यांना कामोनी वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांना इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र, तसेच विशाल घाटगे व झंजाड यांनी सातव यांना कर्ज मिळवून देण्यासाठी काही पैशांची मागणी केली. दरम्यान सातव यांनी त्यांच्या घरावर कर्ज काढून इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र यांना पाच कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी चाळीस लाख रुपये, विशाल घाटगे यास पन्नास लाख कर्ज मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपये तसेच झंजाड नावाच्या व्यक्तीस कर्ज मिळवून देण्यासाठी तीन लाख रुपये दिले.
मात्र सदर फायनान्स मॅनेजरसह अन्य इसम सातव यांचे फोनच उचलत नसल्याने आणि कर्ज देखील मंजूर करत नसल्याने सातव यांनी मानसिक तणावाव जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटनेत संग्राम आबुराव सातव वय ४६ वर्षे रा. शेळके वस्ती मराठी शाळेजवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला. याबाबत जनाबाई संग्राम सातव वय ४२ वर्षे रा. शेळके वस्ती मराठी शाळेजवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र, विशाल घाटगे व झंजाड ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहेत.