mashid (फोटो सौजन्य- pinterest)
जम्मू काश्मीर येथील पहलगाम Pahalgam Terror Attack येथे दहशतवादी हल्ला झाला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पर्यटकांच्या एका समूहावर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हे पोलिस गणवेश परिधान करून आले. आधी त्यांनी पर्यटकांची नावे विचारली, त्यांचे ओळख पत्र तपासली त्यांनतर ते मुस्लिम नसल्याचे समाजाताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना देखील मोठा धक्का बसला आहे. काश्मीरच्या मशिदींमधून घोषणा देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Navi Mumbai Crime: हुक्का बंदीनंतर आता तरुणाई झिंगतेय ई-सिगारेटच्या झुरक्यात
पहलगाम मधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेद काश्मीरच्या मशिदींमधून करण्यात आलं आहे. अश्या लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन देखील सरकारला करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे समर्थक दिसत नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर तिथल्या लोकांनी कँडल मार्च काढला तर अनेक ठिकाणी बंद पुकारण्याचा आला आहे. त्याचे पडसाद निश्चितच पाकिस्तानपर्यंत पोहोचतील.
काय घोषणा करण्यात आली?
पहलगाममध्ये झालेल्या दहशहदवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या मशिदींमधून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. पहलगाम हल्ला इस्लाम आणि मानवतेच्या विरोधात असल्याचे म्हण्टलं गेले. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो आणि हा हल्ला काश्मीरची शांतता आणि एकता नष्ट करण्याचा कट आहे. काश्मीर हे आमचं घर आहे आणि आम्ही ते दहशतवाद्यांच्या हाती जाऊ देणार नाही… अशी देखील घोषणा काश्मीरच्या मशिदींमध्ये करण्यात आली.काश्मीरच्या धार्मगुरुंनी सरकारकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मागणी केली. ते म्हणाले, असे भ्याड हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी…
कोणत्या मशिदीतून करण्यात आली घोषणा?
किश्तवाडीमधील मशिदीतून सांगण्यात आले की, पहलगाममध्ये घडलेली घटना हृदयद्रावक आहे. हल्ल्यात अनेक निष्पापांचे जीव गेले, दहशतवादाच्या नावाखाली लोक मारले गेले, संपूर्ण इस्लामी समुदाय याचा तीव्र निषेध करतो आणि सरकारकडून चौकशीची मागणी करतो. जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी किश्तवाड बंद राहिल.
कँडल मार्च
जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात स्थानिक लोकांनी कँडल मार्च काढून निषेध केला. दरम्यान, श्रीनगरमध्ये स्थानिक लोकांनी मेणबत्त्या पेटवून निषेध केला. काश्मीरचा लाल चौक, जो पूर्वी गर्दीने गजबजलेला असायचा, तो हल्ल्यानंतर रिकामा दिसत होता. मंगळवारी झालेल्या हल्ल्यात अनेकांना अपले प्राण गमवावे लागले आहेत. अनंतनाग, पहलगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, पुलवामा, बडगाम, शोपियान, श्रीनगर येथे मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला.