हुक्का बंदीनंतर आता तरुणाई झिंगतेय ई-सिगारेटच्या झुरक्यात
सावन वैश्य, नवी मुंबई: शहरातील विविध हक्का पार्लरवर नवी मुंबई पोलिसांनी कठोर कारवाई करून जवळपास सर्वच हुक्का पार्लर बंद केले आहेत. त्यामुळे तरुणाईचा कल आता ई सिगारेटकडे वाटताना दिसून येत आहे. त्यामुळे देशात यावर बंदी असताना नवी मुंबई पोलीस इ सिगरेटला नवी मुंबईतून हद्दपार कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत, नशा युक्त पदार्थांचे शहरातून समोर उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वात, पोलीस अधिकारी व अमलदार प्रयत्न करत असून त्याला यश मिळत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत पोलिसांनी करोडो रुपयांची अमली पदार्थ जप्त केली असून यांसारख्या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर ही पोलिसांनी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशातच तरुणाईचे जास्त क्रेझ असलेल्या हुक्का पार्लरवर देखील पोलिसांनी कारवाई खूप सुरू केली असून, शहरातील जवळपास सर्वच वापरले बंद केले आहेत. मात्र युवा पिढीने हुक्का सेवनावर एक नवीन पर्याय म्हणून इ सिगारेट आपला मोर्चा वळवलेला पाहायला मिळत आहे.
ई सिगारेट हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरन आहे, जे बॅटरीवर काम करते. हे उपकरण द्रव पदार्थ गरम करून त्याची वाफ तयार करते. या वाफेत निकोटीन, फ्लेवर व इतर पदार्थ असतात. याला सिगारेटचा पर्याय म्हणून देखील वापरले जाते. मात्र यात तंबाखू नसते. ई सिगारेट हे साधारण खिशात आरामशीर मावेल एवढ्या आकाराचे असते. या ई सिगारेट मध्ये देखील दोन प्रकार येतात. त्यातील एक म्हणजे वापरा आणि फेकून द्या, तर दुसरा म्हणजे त्याला रिफील करून पुन्हा त्याचा वापर केला जाऊ शकतो. यातील पहिल्या प्रकाराची किंमत ही ५०० रुपयांपासून ५ हजार रुपये पर्यंत असते. यात एका सिगरेट मध्ये कमीत कमी १०० झुरके जास्तीत जास्त १००० झुरके सेवन करू शकतो.
नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्यांपासून ते युवकांमध्ये याचे वेळ मोठ्या प्रमाणात आहे. यूज अँड थ्रो या सिगारेटच्या प्रकारामध्ये एक बॅटरी असते, ती सिगरेट मधील द्रव्याची वाफ करून ठराविक झुरके तयार करते. व वापर करून झाल्यावर पुन्हा नवीन ई सिगारेट विकत घ्यावी लागते. व त्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपलब्ध असणारे फ्लेवर रिफील करून जास्त वेळ नशा करू शकतात. यामध्ये फ्लेवर्स असल्याने इ सिगारेटचे सेवन केलेल्या व्यक्तीचा इतर सिगारेट व विडी सेवन केल्यासारखा वास येत नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींना किंवा कोणाला याबाबत शंकाही येत नाही.
साधारण सिगारेट ही आरोग्यास धोकादायक आहेच, मात्र ई सिगारेट ही त्यापेक्षाही जास्त पटीने धोकादायक असल्याचं बोललं जातं. ई सिगारेट मध्ये बॅटरी असते, जी द्रव पदार्थ गरम करण्यासाठी ऊर्जा पुरवून द्रव पदार्थाचे वाफेत रूपांतर करते. यातील द्रव पदार्थाचा वापर करून संपल्यावर, रिफील करून पुन्हा त्याचा वापर करतात. काही लोक सिगारेटला साधारण सिगारेट पेक्षा कमी धोका दायक असल्याचा मानतात. मात्र ई सिगारेट ही १०० पट जास्त धोकादायक आहे. त्यात निकोटीन असल्याने त्याचे व्यसन निर्माण होते, व त्याच्या जास्त सेवनाने फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
ई सिगारेट हे एखाद्या पावर बॅंक अथवा तत्सम उपक्रमांसारखे दिसत असल्याने ते खिशात अथवा बागेत सहज ठेवता येते. त्यामुळे परिवारातील सदस्यांना याबाबत जराशी शंका होत नाही. त्यामुळे पालकांनी सतर्क होऊन आपल्या पाल्यांकडे लक्ष घालण्याची गरज आहे. जेणेकरून पाल्यांना त्याची व्यसन लागून त्यांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
ई सिगारेटला भारतात बंदी असली तरी देखील ऑनलाईन तसेच नवी मुंबईतील टपऱ्यांवर याची सहज विक्री होता दिसून येत आहे. त्यामुळे हुक्का पार्लरवर पोलिसांनी कठोर कारवाई करून ते बंद केले. त्याचप्रमाणे ई सिगरेटला देखील नवी मुंबईतून पोलीस हद्दपार करावे अशी मागणी जोर करत आहे.
नशा मुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत, ज्या ज्या ठिकाणी नशिले पदार्थांची विक्री होते, त्या ठिकाणी वेळोवेळी पोलिसांकडून कारवाई केली जाते. तसेच अँटी नार्कोटिक्स कॅम्पेन अंतर्गत प्रसारित केलेल्या ८८२८११२११२ या हेल्पलाइन नंबरवर नागरिकांनी संपर्क साधून, अमली पदार्थांची विक्री अथवा सेवनाबाबत तक्रार करावी. प्राप्त तक्रारीवरून त्या ठिकाणी पोलीस तात्काळ कारवाई करतील, तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी दिली .