Palghar: एका वडिलांनीच आपल्या पोटच्या पोराची हत्या केली नंतर स्वतः देखील आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना पालघरच्या जव्हार तालुक्यातून समोर आली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय १५) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे तर शरद रघुनाथ भोये ( वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे.
आदित्यचे आजोबा रघुनाथ हे त्यांच्या पिंपळशेत होळीचे माळी येथील त्यांचा शेतावरील घरी गेले होते. त्यावेळी त्याचा १५ वर्षाचा नात भावेशचा नातू भावेशचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली.
पोलिसांना माहिती मिळताच काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत अधिक तपास करत आहे. शरद भोये यांनी मुलाची हत्या नेमकी का केली? याचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशविरोधी कारवायांप्रकरणी नागपुरात पत्रकारास अटक
सध्या देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना नागपूरमध्ये एका पत्रकारास देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटकेतील पत्रकार रेजाझ एम. शीबा सिद्दीक (वय २६) याच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्याच्यासोबत एका महिला सहकाऱीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.