पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चित्रपटगृहात पती पत्नीला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. चित्रपट बघत असतांना ‘स्टोरी आधी सांगू नका’ असे म्हंटल्याने मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या मारहाणी 29 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या तक्रारीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी बातमी! रांचीमधून ISIS च्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या; ATS ची मोठी कारवाई
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि त्याची पत्नी आणि बहिणीसोबत सिनेमा पाहत होता. त्याचवेळी त्याच्या मागील सीटवर बसलेले एक दाम्पत्य सिनेमाची स्टोरी सांगत होते आणि गोंधळ घालत होते. त्यामुळे तरुणाने त्यांना शांत बसण्याची आणि सिनेमाची कथा आधी सांगू नये अशी विनंती केली. या विनंतीमुळे संतापलेल्या आरोपीने त्या तरुणाची कॉलर धरली आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने त्याला लाथा- बुक्क्यांनी मारून जमिनीवर पाडले. यात तरुणाच्या डाव्या हाताला, चेहऱ्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी त्याची पत्नी पुढे आल्यावर आरोपी आणि त्याच्या पत्नीने तिलाही मारहाण केली आणि दोघांना शिवीगाळ केली.
शाळकरी विद्यार्थिनीच्या वादातून गोळीबार, वडगाव मावळमधील प्रकार; तीन आरोपी अटकेत
दरम्यान पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या वादातून झालेल्या बाचाबाचीनंतर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आरोपींच्या भावकीतली एका विद्यार्थिनीला पीडित विद्यार्थ्याने शाळेतून घरी सोडले म्हणून हा गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मावळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय प्रकरण?
फिर्यादी अक्षय एकनाथ मोहिते यांनी दिलेल्या फिरायडीनुसार, अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकतो. त्याने आरोपींच्या भावकीतील एका विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडले होते. याच कारणावरून आरोपी सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजित राजाराम ओवाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी फिर्यादीच्या चुलत भावाला शाळेबाहेरील स्कॉर्पिओमधून घेऊन मारहाण केली. त्यानंतर आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली.
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अक्षय मोहिते आपल्या मित्रांसह एकविरा चौकात बसले होते. त्यावेळी आरोपी पुन्हा तिथे आले. आरोपी रणजित ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी सौरभ वाघमारे आणि अभिषेक ओव्हाळ स्प्लेंडर मोटरसायकलवर आले.सौरभ वाघमारे याने पिस्तूल काढून अक्षय मोहिते यांच्या दिशेने गोळी झाडली, पण ती फायर झाली नाही. राऊंड खाली पडला. त्यानंतर अक्षय मोहिते आणि त्याचे मित्र पळून जात असताना आरोपीने पुन्हा एकदा गोळीबार केला. ही गोळी कोणालाही लागली नाही. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अक्षय जवळच्या सोसायटीत लांबल्याने बचावला.